कल्याण ; अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा (Rape) प्रयत्न ; आरोपीला इतका माज होता की त्याने अटकेनंतरही माध्यमांसमोर दाखवली Victory साइन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । Crime News: कल्याणमध्ये (Kalyan) एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा (Rape) प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतरही आरोपीचा माज उतरला नव्हता. त्याने माध्यमांसमोर बोटं उंचावत विजयाची खून दाखवली. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक संताप व्यक्त करत आहेत.

नेमकं काय झालं?
आरोपी हा सराईत गुन्हेहार असून विशाल गवळी असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर याआधीही बलात्कार आणि छेडछाडीसारखे गुन्हे दाखल झाले आहेत. पीडित मुलगी शिकवणीवरुन घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. इतकंच नाही तर खाली जमिनीवर पाडून बलात्काराचा प्रयत्नही केली. पण मुलीने आपली सुटका करुन घेत घर गाठलं आणि आई-वडिलांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मुलीने हिंमत धावत करुन घेतली सुटका
बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलगी घरी परतत असतानाच विशाल गवळीने स्कुटीवरुन तिचा पाठलाग सुरु केला. संधी मिळताच त्याने तिला खेचत रस्त्याच्या शेजारी नेत तिथे बलात्काराचा प्रयत्न केला होता. पण मुलीने सुटका करुन घेतली आणि तेथून पळ काढला होता. मुलीने आई-वडिलांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *