Gold Silver Rate Today : सोन्याचे भाव उतरले तर चांदी ….. ; जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । ऑगस्ट महिन्याच्या चौथ्या दिवशी सोने-चांदीत घसरण (Gold Silver Price Today) दिसून आली. पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंनी चमक दाखवली. गेल्या दोन दिवसांपासून आपटी बार सुरु आहे. जुलै महिन्यात सोने-चांदीने दरवाढीची मोहिम हाती घेतली होती. पण दोन्ही धातूंना कोणताही जम बसविता आला नाही. नवीन विक्रम करता आलेला नाही. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीने खरेदीदारांना, गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात जागतिक घडामोडींचा परिणाम दिसून आला. डॉलर मजबूत झाल्याने आणि अमेरिकन गंगाजळी वाढल्याने सोने-चांदी घसरली. सोने दोन दिवसांत जवळपास 500 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरले. तर चांदी त्याच्या पाच पट स्वस्त झाली.

सोने आपटले
जुलै महिन्यात अर्ध्यांहून अधिक दिवस सोने-चांदी वधारलेले होते. पण जुलै महिन्याच्या अंतिम टप्प्यात दोन्ही धातूत मोठी पडझड झाली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली. तर 2 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 22 कॅरेट सोने 55,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदीत स्वस्ताई
जुलै महिन्यात चांदीत पडझड झाली होती. तर काही वेळा किंमती वधारल्या. ऑगस्ट महिन्यात चांदीने पहिल्याच दिवशी एक हजारांची उसळी घेतली. दुसऱ्या दिवशी भावात 700 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्ट रोजी चांदीत आपटी बार झाला. किंमती 2300 रुपयांनी घसरल्या. दोन दिवसांत 3 हजार रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपयांवर आला.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,310 रुपये, 23 कॅरेट 59,073 रुपये, 22 कॅरेट सोने 54,328 रुपये, 18 कॅरेट 44,483 रुपये, 14 कॅरेट सोने 34,696 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,197रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *