Dhanashree Verma: श्रेयस अय्यरनंतर आता मोहम्मद सिराज? धनश्री-सिराजचा ‘तो’ फोटो व्हायरल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । युझवेंद्र चहलची ( Yuzvendra Chahal ) पत्नी अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेत असते. धनश्री वर्मा ( Dhanashree Verma ) उत्तम डान्सर असून तिच्या डान्सचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर कधी टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer ) कथिक अफेअरवरून धनश्री चर्चेत असते. अशातच आता पुन्हा एकदा धनश्री चर्चेत आलीये. यावेळी धनश्रीचं ( Dhanashree Verma ) नाव आता टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) सोबत जोडण्यात येतंय.

टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीसह अनेक क्रिकेटपटू सुट्टीच्या काळात इंस्टाग्रामवर एक्टिव्ह असतात. नुकताच विंडीज दौऱ्यावरून मायदेशी परतलेला टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) ही इन्स्टाग्रामवर खूप एक्टिव्ह दिसून येतो. सिराज मैदानावरील गोलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी तो त्याच्या गोलंदाजीमुळे प्रकाश झोतात आलेला नाहीये.

मोहम्मद सिराजसोबतचा धनश्रीचा तो फोटो व्हायरल
युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा ( Dhanashree Verma ) मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) सोबतचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. धनश्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. चहलसोबतचे तिचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता धनश्रीची ( Dhanashree Verma ) मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) सोबतची इन्स्टा स्टोरी व्हायरल झालीये.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *