मनोरंजनाचा सुवर्णकाळ; 28 दिवसांत 100 कोटींपेक्षा जास्त बजेटचे तीन चित्रपट येता हेत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । चित्रपटप्रेमींसाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिने ‘सुवर्णकाळ’ ठरतील. कारण २८ दिवसांत (११ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर) १०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीचे ३ बॉलीवूड चित्रपट चित्रपटगृहांत दाखल होणार आहेत. ११ ऑगस्टला अक्षय कुमारचा ओएमजी-२, सनी देओलचा गदर-२, ७ सप्टेंबरला शाहरुखचा जवान हे चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. याशिवाय १० ऑगस्टला रजनीकांत यांचा जेलर, २८ सप्टेंबरला प्रभासचा सालार येईल. २५ ऑगस्टला येणाऱ्या आयुष्मान खुराणाच्या ड्रीमगर्ल-२ सह या महिन्यात विक्रमी एकूण ३ सिक्वेल येतील. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये एकूण १७ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

१० ला जेलर, ११ ला ओएमजी-२ व गदर-२, ७ सप्टेंबरला जवान, २८ला सालार प्रदर्शित होणार

मागील विक्रम : २०१७ मध्ये २२ दिवसांत १०० कोटींचे ३ चित्रपट आले

चित्रपट एकूण खर्च
सालार ४०० कोटी
जवान २०० कोटी
जेलर २०० कोटी
ओएमजी-२ १५० कोटी
गदर-२ १०० कोटी

२०१७ मध्ये २२ दिवसांत १०० कोटींपेक्षा जास्त बजेटचे ३ चित्रपट (रईस-१२७ कोटी, ट्यूबलाइट-१३५ कोटी, जग्गा जासूस १३१ कोटी रु.) आले होते.

१ तारीख २ चित्रपट : २४ वर्षांत २० मोठ्या चित्रपटांची टक्कर, १७ यशस्वी

२४ वर्षांत २० मोठे चित्रपट वेगवेगळ्या महिन्यांत एकाच तारखेला प्रदर्शित झाले. यात ६ ब्लॉकबस्टर, ११ हिट, २ फ्लॉप, १ सरासरी.

यांची टक्कर : ए दिल है मुश्किल-शिवाय, काबिल-रईस, ओम शांती ओम-सांवरिया, दिलवाले-बाजीराव मस्तानी, बाहुबली- बजरंगी भाईजान, हैदर-बँग बँग, डॉन-जानेमन, लगान-गदर, मोहब्बतें-मिशन कश्मीर आणि वीरझारा-ऐतराज.

फक्त हे फ्लॉप : सांवरिया आणि जानेमन. हैदर चित्रपट सरासरीच्या श्रेणीत राहिला.

सक्सेस रेट… अक्षयचा ३४% आणि सनी देओलचा ३०% पर्यंत राहिला

अक्षयने २६ वर्षांच्या कारकीर्दीत जवळपास १०९ चित्रपट केले. ३४% यशस्वी ठरले. त्याच्या चित्रपटांनी एकूण ३,०२९ कोटी रुपयांपर्यंत कमाई केली. सनीने ३० वर्षांत ८० चित्रपट केले. ३०% यशस्वी झाले. त्याच्या चित्रपटांनी एकूण १,३६४ कोटींची कमाई केली.

गेल्या वर्षी १०० कोटी किंवा त्यापेक्षा बजेटचे ६ बॉलीवूड चित्रपट आले होते

२०२२ मध्ये १०० कोटी, त्यापेक्षा अधिक बजेटच्या ६ बॉलीवूड चित्रपटांत शमशेरा, सम्राट पृथ्वीराज, विक्रम वेधा, लालसिंह चड्ढा, गंगुबाई आणि ब्रह्मास्त्र यांचा समावेश होता. यापैकी २ यशस्वी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *