राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा ; संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न ; जयंत पाटील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काही आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांनी रविवारी चांगलेच राजकारण तापले. यातच पुणे दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शाह यांची पाटील यांनी भेट घेतल्याची चर्चा दिवसभर होती. मंत्रिमंडळ विस्तारात पाटलांसह काही जणांना संधी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, जयंत पाटील यांनी आपण अमित शाह यांना भेटलो नसल्याचे स्पष्ट करत चर्चेला विराम दिला.

अजित पवार यांचा उल्लेख करताना अमित शाह म्हणाले, “अजितदादा, तुम्ही उपमुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच आपण एकाच व्यासपीठावर आलाे आहोत. दादा, खूप वर्षांनंतर योग्य जागी बसला आहात. हीच जागा तुमच्यासाठी योग्य होती, पण तुम्ही येण्यास बराच उशीर केला.’ शाह यांच्या या वाक्याला अजितदादांनी दोन्ही हात जोडून मान हलवली.

मला असं वाटतं की, काही लोकांना अफवा पसरवायला फार आवडते. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी किमान खात्री करून बातम्या दिल्या पाहिजेत. जयंत पाटील आणि अमित शाह यांच्यात कुठलीही भेट झाली नाही. जे पतंगबाजी करताहेत त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपला काहीतरी स्तर राखावा. तसेच अशा घटनेची पुष्टी केल्यानंतरच अशा प्रकारच्या बातम्या द्याव्यात.-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मी अमित शाह यांना भेटलो नसून मी कोणाच्याही संपर्कात नाही. शनिवारी संध्याकाळी मी शरद पवार यांच्या घरी होतो. मी त्यांना सतत भेटत आहे. माझ्याबद्दल संभ्रम पसरवला जात आहे, पण महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे की मी काय आहे? – जयंत पाटील, राष्ट्रवादी, प्रदेशाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *