Dharmendra | धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओल म्हणाले ‘माझे वडील …’

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । ‘शोले’, ‘अपने’, ‘सीता और गीता’, ‘धरम वीर’, ‘लोहा’, ‘आंखे’, ‘यमला पगला दिवाना’, ‘अली बाबा चालीस चोर’, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेते धर्मेंद्र यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. वयाच्या ८७ व्या वर्षी देखील धर्मेंद्र मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. नुकताच धर्मेंद्र दिग्दर्शक करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले आहे.

‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ बॉक्स ऑफिसवर कमाई देखील करताना दिसत आहे. पण सिनेमा अभिनेता राणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लव्हस्टोरीमुळे नाही तर, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनमुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगत आहे.

धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर अभिनेत्री आणि पत्नी हेमा मालिनी यांच्यानंतर अभिनेते सनी देओल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी वडिलांच्या किसिंग सीनवर सनी देओल म्हणाले, ‘माझे वडील काहीही करु शकतात. मी तर म्हणेल, माझे एकमेव अभिनेते आहेतच, जे या वयात असं करू शकतात…’

पुढे सनी देओल म्हणाले, ‘मी अद्याप वडिलांचा सिनेमा पाहिलेला नाही. मी जास्त सिनेमे पाहत नाही. माझे अनेक सिनेमे देखील मी पाहिले नाहीत. एवढंच नाही तर किसिंग सीनवर मी माझ्या वडिलांसोबत बोलू देखील शकत नाही.’ सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओल यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा रंगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *