काही जण माझ्यावर टीका करतात पण.. अमित शहांनी कौतुक केल्यांनतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले. यावरून संजय राऊतांनी आज त्यांच्यावर टीकास्र सोडलं होतं. संजय राऊतांच्या या टीकेवर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी अजित पवार म्हणाले, तुम्हाला का वाईट वाटतंय कौतुक केलेलं. असुद्या तुम्हाला उद्योग नाही. हे यांनी कौतुक केलं? तुम्हाला काय वाटतंय. त्यांनी टीका केली, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय करायचंय. असा प्रश्न अजित दादांनी पत्रकारांना केला.

पुढे म्हणाले, आम्ही वडिलधाऱ्यांचे आदर करणारे माणसं आहोत आज देश पातळीवर मला तरी नरेंद्र मोदीं हे एक मजबूत नेता देशाला मिळालेले आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा मला पर्याय दिसत नाही. काहीजण माज्यावर टीका करतात. अजित पवार मागे तुम्ही असे बोलत होता. आता असं बोलताय. माणसाचे अनुभवातून वेगवेगळी मत होऊ शकतात. देशाच्या पंतप्रधानांनी ५०० रेल्वे स्टेशन २५ हजार कोटींची तरतूद केली. त्यामध्ये पहिल्या टप्यात १२६ रेल्वे स्टेशन घेतली. १३ हजार कोटींची तरतूद केली. त्यामध्ये आपल्या महारष्ट्राची ४४ रेल्वे स्टेशन घेतली. यामध्ये प्रत्येकाला ४० कोटी निधी दिला. ही रक्कम काय कमी आहे का असे अजित पवार म्हणले.

सहकार आयुक्त कार्यलय आहे ते येरवड्याला शिफ्ट केलं जाणार त्यावर पवार चांगलेच संतापले, ही आपल्या डोक्यात कोणी भर घातली, आणि कुठं बैठक झाली. कोणी बैठक आयोजित केली, कोणते उपसचिव? असे म्हणत अजित पवार पत्रकारांवर चांगलेच संतापले.

राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली, या प्रश्नावर बोलताना म्हणले, तो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. आपल्या संविधानाच्या निमित्तानं जे संविधान देशातील १४० कोटी जनतेने मान्य केलेलं आहे. त्याप्रकारे प्रत्येकाला अपील करण्याचा अधिकार आहे. आणि न्यायव्यवस्था त्यांना जे योग्य वाटत तो न्याय देतो. या पद्धतीने त्यांनी न्याय दिलेला आहे. असे अजित पवार म्हणले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *