Ishan Kishan : इशानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल झाला, तोंडावर पडला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । Wi vs Ind 2nd T20 Ishan Kishan : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी गयाना येथे खेळला गेला, ज्यामध्ये यजमानांनी भारतीय संघाचा 2 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान अशीही एक घटना घडली ज्यामुळे इशान किशन सध्या चर्चेत आला आहे.

खरं तर, भारतीय यष्टीरक्षकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो कॅरेबियन कर्णधार रोव्हमन पॉवेलला स्टंप आऊट करण्याचा चतुराई दाखवत होता.

वास्तविक, ही घटना वेस्ट इंडिजच्या डावाच्या 7 व्या षटकात घडली. भारतीय संघासाठी युझवेंद्र चहल हे षटक करत होता. षटकातील पहिला चेंडू चहलने लेग स्टंपवर टाकला. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क न झाल्याने चेंडू थेट यष्टिरक्षक इशान किशनच्या हातात गेला. इथे किशनला हुशारी दाखवत कॅरेबियन कर्णधाराला स्टंप आऊट करायचे होते.

इशान चेंडू घेऊन स्टंपजवळ उभा राहिला. खरं तर, तो पॉवेलचा मागचा पाय हवेत उचलण्याची आणि नंतर बेल्स उडवण्याची वाट पाहत होता. होय इशानला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणे फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवायचे होते, परंतु तो येथे तोंडावर पडला.

रोव्हमन पॉवेलने थोडीशी हलचाल केली आणि इशानने बेल्स पाडल्या. यष्टिरक्षकाने अपील केले आणि निर्णय तिसऱ्या पंचाकडे गेला. तिसर्‍या पंचांनी वेगवेगळ्या कोनातून फ्रेम्स पाहिल्यानंतर, इशानने बेल्स पाडताना पॉवेलचा पाय हवेत नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे कॅरेबियन कर्णधार बचावला. विशेष म्हणजे याआधीही इशान किशनने विरोधी फलंदाजांना अशाप्रकारे स्टंप आऊट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला यश आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *