“जैव वैद्यकीय कचरा प्रकल्प उभारणीसाठी निविदा प्रकिया राबवा ” आमदार अण्णा बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी: जैव वैद्यकीय कचरा अर्थात बायो मेडिकल वेस्ट नष्ट करणेसाठी मोशी कचरा डेपो येथे प्रकल्प उभारणी करणे व त्याचे संचालन १५ वर्षे करणे हे काम पास्को या ठेकेदार कंपनीस देणेबाबतचा प्रस्तावास स्थायी समिती मान्यता दिली असून तो महासभाते मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव रद्द करून नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी आमदार आणा बनसोडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालये व दवाखान्यामधून निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा गोळा करताना मोठा भ्रष्टाचार सुरु असून करारनाम्यातील अटी शर्तीचा व शब्द रचनेचा फायदा घेऊन प्रशासन ठेकेदारावर उदार होऊन कोणती ही निविदा प्रक्रिया न राबविता १५ वर्षे एवढ्या दीर्घ कालावधीसाठी पास्को या ठेकेदार कंपनीस ठेका देण्यासाठी प्रयत्नशील असल्याने या प्रकरणी टेंडर काढण्याची मागणी आमदार बनसोडे यांनी केली आहे. याचबरोबर त्यांनी पुढील मुद्द्यावर आयुक्तांकडून खुलासा मागविला आहे. १. सदर प्लांट मोशी येथे स्थलांतर करून १५ वर्षे एवढ्या दीर्घ मुदतीने संचालणासाठी त्याच ठेकेदार कंपनीस देण्याचा उद्देश काय? २. पारदर्शक व स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबविता करारनाम्यातील अटी शर्तीचा व शब्द रचनेचा फायदा घेऊन प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी व महासभेत समोर ठेवण्याचा हेतू काय? ३.निविदा प्रक्रिया न राबविल्याने मनपाचा काय व किती फायदा होणार आहे हे प्रसिद्धी पत्रकाद्वारे व प्रसारमाध्यमान्द्वारे शहरातील नागरिकांना अवगत करावे? असा खुलासा आमदार बनसोडे यांनी मागविला आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याचा या प्रकरणी दबाव असल्याची चर्चा प्रशासकीय यंत्रणेत असून मनपा प्रशासनाने अशा प्रकारे शासनास अंधारात ठेऊन स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबविता ठेकेदारास काम देणे योग्य नाही. करारनाम्यातील अटी व शर्तीचा फायदा घेऊन मनपात भ्रष्टाचार सुरु आहे. असा प्रकार थांबला पाहिजे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे या प्रकरणी चौकशी करून कारवाई करणेबाबतही मागणी केली असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *