ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगा ; अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – इंटरनेट बँकिंगद्वारे बँकांचे व्यवहार करणे सोयीचे असल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच बरेच ज्येष्ठ नागरिक सध्या इंटरनेट बँकिंगला पसंती देत आहेत. मात्र, असे ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.

ऑनलाइन आर्थिक व्यवहारांसोबतच इंटरनेटचा वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येतही वाढ होत आहे. आपण कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही अनोळखी लिंकवर, तसेच कोणत्याही संकेतस्थळावर आपली माहिती, आपल्या बँक खात्यांची माहिती, डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये. बरेच ज्येष्ठ नागरिक सध्या फेसबुकचा वापर करायलाही शिकत आहेत व आपल्या परिचयातील जुन्या व्यक्तींना फेसबुकवर शोधतात. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर स्वतःची सगळी माहिती देणे टाळावे. सायबर गुन्हेगारांच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक हे सर्वात सोपे टार्गेट असतात, त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी इंटरनेट बँकिंग व सोशल मीडिया वापरताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन आर्थिक किंवा अन्य कोणत्या प्रकारे फसवणूक झाली असल्यास, त्यांनी लगेच नजीकच्या पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद करावी, असे आवाहनही महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *