‘ तीन महिन्यांचं लाईट बील पाठवून नागरिकांची आर्थिक कोंडी करू नका : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत करार करण्याचं सूचवलं होतं. त्यानंतर, पुन्हा एकदा फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. राज्यातील नागरिकांच्या लाईट बिलाची समस्या या पत्रातून फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. लॉकडाउन काळात ग्राहकांच्या घरातील मिटरचे रिडिंग न घेतल्यामुळे सध्या एकदम तीन महिन्यांचे बील नागरिकांच्या माथी मारले जात असून हे चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सर्वसामान्य नागरिक व औद्योगिक ग्राहकांची कैफियत मांडली आहे. वीजबिलांचा घरगुती ग्राहकांवर नाहक भुर्दंड टाकून सरसगट तीन महिन्यांची वीज बिले दिल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे. तर, दुसरीकडे औद्योगिक ग्राहकांचीही हीच परिस्थिती असून तीन महिने उद्योग बंद असतानाही भरमसाठ वीजबिल आकारण्यात येत आहे. त्यामुळे घरगुती ग्राहक व औद्योगिक ग्राहकांन नाहक भुर्दंड सोसावा लागत असून या समस्यकडे लक्ष देण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे.

वीजबिलांचा घरगुती ग्राहकांवर नाहक भुर्दंड टाकून सरसगट तीन महिन्यांची वीज बिले दिल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याबाबत तसेच उद्योग बंद असताना त्यांनाही बिले दिले जात असल्याबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र …

घरगुती ग्राहकांकडून लॉकडाउन काळातील 300 युनिटपर्यंतचे लाईटबील माफ करण्याची मागणी करण्यात येत असल्याचं संदर्भ देत, नागरिकांना सरसकट तीन महिन्यांची बिले पाठविण्यात आल्याचे फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारने आत्मनिर्भर अभियानातून राज्यातील वीज वितरण कंपन्यांना 90 हजार कोटी रुपयांचे उभारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे, ग्राहकांकडून सक्तीने 3 महिन्यांचे वीजबील न घेता, टप्प्या-टप्प्याने सुयोग्य मासिक हफ्त्यात त्यांना वीज बील भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे. राज्य सरकारने निर्णय घेऊन, घरगुती ग्राहकांना तातडीने दिलासा द्यावी, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *