महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात जगातील सर्वात उंच शिव मंदिर स्थित आहे. (Shravan Special – Tungnath Temple) या मंदिराला तुंगनाथ मंदिर देखील म्हटले जाते. असे म्हटले जाते की, या मंदिराची निर्मिती पांडवांद्वारे करण्यात आली होती. तुंगनाथ पर्वतावर स्थित असलेल्या या मंदिराची उंची ३६४० मीटर आहे. तुंगनाथ मंदिर पंचकेदार (तुंगनाथ, केदारनाथ, मध्य महेश्वर, रुद्रनाथ आणि कल्पेश्वर) पैकी सर्वात उंचावर स्थित आहे. असे म्हटले जाते की, याच ठिकाणी शिव भुजा रूपात विद्यमान आहेत. म्हणूनच प्राचीनकाळापासून या मंदिरात भगवान शिवच्या भुजांची पूजा होते.
तुंगनाथ मंदिर विषयी पौराणिक मान्यता आहे की, या मंदिराची निर्मिती पांडवांद्वारे करण्यात आली होती. जेव्हा महाभारत युद्धात नरसंहाराने शिवजी पांडवांवर नाराज होते, तेव्हा त्यांना प्रसन्न करण्यासाठी पांडवांनी हे मंदिर बनवलं होतं. याशिवाय असे म्हटले जाते की, माता पार्वतीने भगवाव शिवला पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी तुंगनाथजवळ तपस्या केली होती.
चंद्रशिलाच्य़ा दर्शनाविना तुंगनाथ मंदिराची यात्रा अपूर्ण मानली जाते. मंदिरापासून काही अंतरावर चंद्रशिला मंदिर आहे. येथे रावणशिला आहे, ज्याला (स्पीकिंग माउंटेन) नावाने ओळखले जाते. सगळीकडे बर्फ, मऊमऊ गवत, रंग-बिरंगे फूल आणि ढगांनी व्यापलेला धुक्याने वेढलेला हा परिसर तुम्हाला भुरळ घालेल. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येथे फक्त बर्फाची चादर दिसते. म्हणूनच या ठिकाणाला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असेही म्हणतात. असेही म्हटले जाते की, उत्तराखंडचे तुंगनाथ मंदिर महादेव आणि पार्वती देवीला समर्पित आहे. १८ व्या शतकात संत शंकराचार्यांनी या मंदिराचा शोध लावल्याचे सांगितले जाते. मंदिरासोबतच आजूबाजूचे सौंदर्यही मंत्रमुग्ध करणारे आहे.