HEALTH : तुम्‍ही जेवणापूर्वी आणि नंतर चहा-काॅफी पिताय? ICMRचा सल्ला वाचा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । चहा आणि कॉफी ही आपल्‍या जगण्‍यातील अविभाज्‍य भाग असणारी पेये. त्‍यामुळे दिवसभरात या दोन्‍ही पेयांचा वापर हा मनमुराद सुरु असतो. मात्र जेवणापूवी आणि नंतर चहा आणि कॉफीचे सेवन हे हानीकारक ठरते. त्‍यामुळे याचे सेवन करता संयम बाळगा, असा सल्‍ला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिला आहे. जाणून घेवूया चहा आणि कॉफीच्‍या सेवनाबाबत दिलेल्‍या सल्‍ल्‍या विषयी…

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) यांनी संयुक्‍तपणे १७ नवीन आहारविषयक मार्गदर्शक तत्त्‍वे जाहीर केली आहेत. देशभरातील निरोगी आहाराच्‍या सवयींना प्रोत्‍साहन देणे हा यामागील उद्दिष्ट आहे.

चहा, कॉफी सेवनाने शरीरावर नेमका काय परिणाम होतो?
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्‍या (ICMR) संशोधकांनी स्‍पष्‍ट केले आहे की, चहा आणि कॉफी या दोन्‍ही पेयांमध्‍ये टॅनिन असते. याचा परिणाम शरीराच्‍या मध्‍यवर्ती मज्‍जासंस्‍थेवर होतो. म्‍हणजे ही दोन्‍ही पेय मज्‍जासंस्‍थेला उत्तेजित करतात. 150 मिली कप कॉफीमध्ये 80 – 120 मिलीग्राम कॅफिन असते, इन्स्टंट कॉफीमध्ये 50 – 65mg असते आणि चहामध्ये 30 – 65mg असते.

टॅनिनमुळे शरीरावर काेणता दुष्‍परिणाम होताे?
ICMRने सल्‍ला दिला आहे की, जेवणापूर्वी आणि नंतर किमान एक तास चहा किंवा कॉफीचे सवेन टाळणे आवश्‍यक आहे. कारण या पेयांमध्‍ये असणार्‍या टॅनिन हे लोहयुक्त पदार्थ शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतात. टॅनिनमुळे लोहाच्‍या शोषणाला अडथळा निर्माण होता. या दोन्‍ही पेय जेवनापूर्वी आणि जेवनानंतर तत्‍काळ पिल्‍यास लोहाची कमतरता आणि ॲनिमिया सारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. कॉफीच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाची अनियमितता देखील होऊ शकते, असेही संशोधकांनी स्‍पष्‍ट केले आहे.

विनादूध चहा आराेग्‍यासाठी लाभदायक
दुधाशिवाय चहा पिण्याचे विविध फायदे आहेत. अशा प्रकराचा चहा हा दृहयविकार आणि पोटाचा कर्करोगचा धोका कमी होण्‍यास पूरक आहे. तसेच फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, सीफूड अशा समृध्द आहाराचीही इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने शिफारस केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *