महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१६ मे ।। Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. वायदे बाजारातही सोन्या चांदीच्या दरातही वाढ दिसून आली आहे. ऐन लग्नसराईत सोन वाढत असल्याने सोन्याची खरेदी करण्याऱ्यांसाठी चिंता निर्माण झाली आहे. चांदीच्या फ्युचर्सने बुधवारी सुमारे ११ वर्षातील त्यांचा सर्वोच्च सेटलमेंट पोस्ट केला. चांदीच्या दरात सर्वात मोठी वाढ दिसून आली. यूएस सरकारच्या डेटाने चलनवाढीचा दर मंदावल्याचा खुलासा केल्यानंतर, या वर्षी व्याज-दर कपातीच्या अपेक्षा पूर्ण केल्या, सोन्याच्या फ्युचर्सने तीन आठवड्यांपेक्षा जास्त उच्चांक गाठल्याचे दिसून आले. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात सोन्या आणि चांदीच्या वायदे दरांमध्ये तेजी दिसत असून दोन्ही मौल्यवान धातूच्या किमतीत जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. आज गुरुवारी सुद्धा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चला तर जाणून घेऊया आजचे दर काय…
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७३,४४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,२८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८७,३७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८५,३६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,२१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,३२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,२१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,३२० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,२१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,३२० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,२१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,३२० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील चांदीचा दर
मुंबईमध्ये चांदी ८७,२५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. पुण्यात ८७,२५० रुपये प्रति किलो, नागपूरमध्ये ८७,२५० तर नाशिकमध्ये ८७,२५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)