महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मे ।। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचाराला शनिवारी पूर्णविराम मिळाला. मुंबईतील सहा जागांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 लोकसभा मतदारसंघांत सोमवार, 20 मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशीसुद्धा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडल्याने राजकीय तापमानसुद्धा वाढल्याचे चित्र आहे. प्रत्यक्ष प्रचाराचा कालावधी संपला असला, तरी आता पुढील दोन दिवस छुप्या प्रचाराला गती येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह संपूर्ण निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे.
राज्यातील 13 मतदारसंघांत होणार कडवी झुंज
मुंबई उत्तर : पीयूष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)
मुंबई उत्तर पश्चिम : अमोल कीर्तिकर (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) वि. रवींद्र वायकर (शिवसेना-एकनाथ शिंदे)
मुंबई उत्तर पूर्व : मिहिर कोटेचा (भाजप) वि. संजय दिना पाटील (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मुंबई उत्तर मध्य : उज्ज्वल निकम (भाजप) वि. वर्षा गायकवाड (काँग्रेस)
मुंबई दक्षिण : अरविंद सावंत (शिवसेना-ठाकरे) वि. यामिनी जाधव (शिवसेना-शिंदे)
मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना-शिंदे) वि. अनिल देसाई (शिवसेना-ठाकरे)
नाशिक : हेमंत गोडसे (शिवसेना-एकनाथ शिंदे) वि. राजाभाऊ वाजे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे)
धुळे : शोभा बच्छाव (काँग्रेस) वि. सुभाष भामरे (भाजप)
दिंडोरी : भारती पवार (भाजप) वि. भास्कर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार)
पालघर : हेमंत विष्णू सावरा (भाजप) वि. भारती कामडी (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे)
ठाणे : राजन विचारे (शिवसेना-ठाकरे) वि. नरेश म्हस्के (शिवसेना-शिंदे)
कल्याण : डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना-शिंदे) वि. वैशाली दरेकर (शिवसेना-ठाकरे)
भिवंडी : कपिल पाटील (भाजप) वि. सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार)