मान्सूनचा महाराष्ट्रात या तारखे दरम्यान प्रवेश; असा असेल पुढचा प्रवास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे ।। मान्सून अंदमान-निकोबारमध्ये गतवर्षाप्रमाणेही यंदाही 19 मे रोजी (रविवारी) दाखल झाला. केरळमध्ये गतवर्षी 9 दिवस उशिराने 8 जून रोजी दाखल झालेला मान्सून यंदा मात्र 31 मेपर्यंत दाखल होईल. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली.

केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख 1 जून आहे. जाहीर केलेल्या तारखेत तीन-चार दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. 28 मे ते 3 जून दरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. पुढे 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात, 25 जून रोजी राजस्थान आणि 6 जुलैपर्यंत मध्य प्रदेशात तो पोहोचण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात 18 ते 25 जूनपर्यंत आणि बिहार-झारखंडमध्ये 18 जूनपर्यंत मान्सून पोहोचेल.

गत तीन वर्षांतील मान्सूनची एन्ट्री

2020 मध्ये मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.
2021 मध्ये 3 जून रोजी, तर 2022 मध्ये 29 मे रोजी दाखल झाला होता.
2023 मध्ये 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.

पावसाची सरासरी काय?
4 महिन्यांच्या पावसाळ्यासाठी दीर्घ कालावधीची सरासरी 86.86 सें.मी. आहे.
याचा अर्थ असा की, पावसाळ्यात इतका एकूण पाऊस झाला पाहिजे.
यावर्षी सरासरीहून अधिक म्हणजे 106 टक्के (87 सेंमी) पाऊस शक्य आहे.

ला निनामुळे यंदा चांगला पाऊस
एल निनो आणि ला निना या हवामानाच्या दोन परिस्थितींचा परिणाम पावसावर होतो. गतवर्षी एल निनो सक्रिय होता, तर यावेळी एल निनो या आठवड्यात आटोपला आहे.
येत्या 3 ते 5 आठवड्यांत ला निनाची स्थिती निर्माण होणे शक्य आहे. गतवर्षी एल निनो दरम्यान, सरासरीहून कमी म्हणजे 94 टक्केच पाऊस झाला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *