Swargate Bus Stand: …… स्वारगेट स्थानकातून बस नव्हे हाेड्या चालवा ; चिखल राडाराेड्यामुळे आराेग्य धाेक्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे ।। पुण्यात पाऊस आला की धडकी भरते ते राज्यातून पुण्यात आलेल्या प्रवाशांना. कारण ही तसेच आहे. पावसामुळे स्वारगेट बस थांब्यावर माेठ्या प्रमाणात पाणी साचते. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणा-या प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. दरम्यान स्वारगेट बस थांब्यांवर साचत असलेल्या पाण्यामुळे एसटी चालक, वाहकांना देखील त्रास हाेते परंतु काेणाला दाद मागायची असा प्रश्न कदाचित त्यांना पडत असावा अशी चर्चा आहे. (Maharashtra News)

स्वारगेट एसटी आगारात सातत्याने साचलेल्या पाण्याच्या तळ्यामुळे प्रवासी अक्षरश: हैराण झाले आहेत. एसटी अधिकार्‍यांकडून याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे असा आराेप नियमीत प्रवास करणारे प्रवासी करतात. स्वारगेट स्थानकातील हे तळे आणि त्याच्या परिसरातील खड्डे, चिखल,यांपासून आमची सुटका कधी होणार? असा सवाल प्रवासी करु लागले आहेत. या बसस्थानकातून बस नव्हे आता हाेड्यांची गरज असल्याचे चित्र असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

या स्थानकातून सातारा आणि बारामती येथे विना थांबा बस सेवा पूरविली जाते. काही प्रवासी म्हणाले किरकोळ एक पाऊस पडला की स्वारगेट स्थानकामध्ये पाण्याचे तळे साचत आहे. यातून रस्ता काढताना आम्हांला नाकी नऊ येत आहे.

हा प्रकार गेली काही वर्षांपासून सुरु आहे. पण अजून किती सहन करावे लागणार असा सूर प्रवाशांचा दिसून आला. यामुळे एसटीच्या अधिकार्‍यांना प्रवाशांच्या सुविधेशी काहीही घेण-देणे नसल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *