महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ मे ।। कार अपघात प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाने पोर्श कारने दोघांना धडक दिली होती, परिणामी दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर अवघ्या 5 तासांत आरोपी अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणाने सोशल मीडियावर जोर धरल्यानंतर आता पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या बांधकाम व्यावसायिक वडिलांनाही आरोपी बनवून अटक केली आहे. पुणे कार अपघात प्रकरणावर, पुणे सीपी अमितेश कुमार म्हणाले, ‘एफआयआरमध्ये 5 आरोपी होते, त्यापैकी 3 आरोपींना आम्ही रात्री उशिरा अटक केली. त्यांना आम्ही न्यायालयात हजर करू. आरोपीचे वडील फरार असून त्यालाही ‘कस्टडी’ करण्यात आली आहे.
त्यामुळे पुणे अपघात प्रकरणात आज सर्वात मोठी घडामोड होणार आहे. आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केल्या जाणार आहे. तसेच आरोपीचा फॉरेन्सीक रिपोर्ट देखील येणार आहे. आल्पवयीन आरोपीवर दाखल केलेल्या गुन्ह्यात कलमं देखील वाढवली. (Pune Porsche Accident Update)
आरोपीवर मोटार वाहन कायद्यातील १८५ च्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. तर विशाल आग्रवाल याला दुपारी २ वाजता कोर्टात करण्यात येणार आहे. ससून रुग्णालयात त्यांची काल तपासणी करण्यात आली आहे.
तर विशाल अग्रवाल यांच आरोपी मुलगा याला बाल न्याय मंडळासमोर नेण्यात येणार आहे. अल्पवयीन प्रकरणात मोडतं म्हणून आरोपीला जामीन मिळाला असं म्हटल्या जात होतं. मात्र पुणे पोलिसांनी नव्याने अर्ज केला आहे. या प्रौढ गटामध्ये गणल्या जावं. दरम्यान आज यावर सुनावणी होणार आहे.
कोर्टाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना काय आदेश मिळतील, हे पाहणे महत्वाचे आहे.
१८५ कलमानुसार दारु पिवून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यासाठी दोन दिवस लावले. ज्या दिवशी अपघात झाल्या त्याच दिवशी गा गुन्हा दाखल करायला हवा होता असं नागरिकांचे म्हणणे आहे.