RR vs RCB : सामना न खेळता RCB आयपीएलमधून जाणार बाहेर? BCCIच्या ‘या’ नियमामुळे चाहते टेन्शनमध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ मे ।। RR vs RCB IPL 2024 Eliminator updates : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थानचा संघ तिसऱ्या तर आरसीबीचा संघ चौथ्या क्रमांकावर होता.

जो संघ एलिमिनेटर सामना हरेल तो आयपीएल 2024 मधून बाहेर जाईल. मात्र, आरसीबीचा संघ सामना न खेळताच बाहेर होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. बीसीसीआयच्या या नियमामुळे आरसीबी चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.

आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात जर पाऊस पडला तर बंगळुरूच्या चाहत्यांची चिंता वाढू शकते. याचे कारण प्लेऑफ सामन्यांसाठी राखीव दिवस नाही. आणि जर पावसामुळे सामना रद्द झाला नाही तर गुणतालिकेत वरचा संघ पुढे जाईल.

नियमानुसार, पावसामुळे सामना उशीर झाला, तर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 2 तास दिले जातील. प्लेऑफ सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही. जर पाऊस पडला तर पंच किमान 5 षटकांचा सामना आयोजित करण्याचा प्रयत्न करतील. जर 5 षटकांचा सामना देखील होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर होईल आणि जर सततच्या पावसामुळे सुपर ओव्हर देखील होऊ शकली नाही तर सामना रद्द घोषित केला जाईल. अशा परिस्थितीत जो संघ गुणतालिकेत वरचा असेल तोच पुढे जाईल.

उदाहरणार्थ, जर आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला, तर राजस्थान रॉयल्स संघ पुढे जाईल आणि आरसीबी बाहेर जाईल, कारण ते पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या खाली आहेत. अशा परिस्थितीत आरसीबी एकही सामना न खेळता आयपीएलमधून बाहेर पडू शकते आणि हा संघासाठी मोठा धक्का असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *