महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मराठवाडा विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – लातूर: दि, २५ – जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची तिरू नदीवर सात बॅरेजेस बांधण्यात यावेत, या मागणीला अखेर मुहूर्त ठरला असून राज्य शासनाने आज सायंकाळी या नदीवरील सात बँरेजचे सर्वेक्षण करण्यात यावे व त्याचे २०२० मध्येच बांधकाम करण्यात यावे. अशी तत्वता मान्यता शासनाचे अप्पर सचिव रो.र. पौळ कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळांच्या संचालकानि काढले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी जळकोट येथे एका शेतकरी मेळाव्यात तिरू नदीवर सात बॅरेजेस बांधण्यात येतील अशी घोषणा केली होती. मात्र ते काम गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून लालफितीत अडकून पडले होते.
जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची पाणीटंचाईची बंधाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा करून सदर त्याच्या सर्वेक्षणास व बांधकामासाठी तत्त्वत मान्यता मिळवून घेतली आहे. या कामी 53 कोटी 29 लक्ष रुपये या बॅरेजेस वर खर्च करण्यात येणार असून १६ किमी अंतराच्या तिरू नदीवर सदरचे सात बॅरेजेस बांधण्यात येणार आहेत.
एकुरका, मंगरूळ, डोंगर कोनाळी, डोंगरगाव, मरसांगवी, आतनूर, गव्हाण, बोरगाव, तिरुका यासह अन्य सोळा गावांना या बेरजेचा लाभ होणार आहे, व शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती निर्माण होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. पाणी पातळी वाढेल पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल जळकोट तालुक्याचे डोंगरी असलेले नाव पुसून जाऊन हीच सिंचनाचा तालुका होईल अशी अपेक्षा ना.बनसोडे यांनी व्यक्त केली.