Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ ; घसरणीनंतर पुन्हा वाढले दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। Gold Silver Price 27 May: वातावरणासोबतच सोन्या-चांदीने सराफा बाजारातील गरमीही वाढवली आहे. आज 27 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 134 रुपयांनी महागून 72162 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर दुसरीकडे चांदीचा भावही 828 रुपयांनी वधारून 90590 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे. 22 मे रोजी सराफा बाजारात चांदीचा भाव 93094 रुपये प्रति किलोच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे 21 मे रोजी सोन्याने 74222 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आयबीजेएच्या ताज्या दरानुसार, सोमवारी, 27 मे रोजी 23 कॅरेट सोन्याचा भाव 133 रुपये प्रति 10 ग्रॅम ने वाढून 71873 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 74,029 रुपये होईल. इतर शुल्कांसह तो 81432 रुपयांच्या जवळपास असेल. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 122 रुपयांनी वाढून 66100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर, जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफा जोडल्यानंतर 22 कॅरेटची किंमतही 74८९१ रुपयांवर पोहोचली आहे.

तर सराफा बाजारात 18 कॅरेट सोन्याचा भाव 101 रुपयांनी वाढून 44122 रुपये झाला आहे. तर जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफा मिळून 18 कॅरेट सोन्याचा भाव 61320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह 74326 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. तर जीएसटीसह चांदीचा भाव 93307 रुपये प्रति किलो होईल.

(टीप – सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जारी केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस नाहीत. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असू शकतो.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *