Credit Card: पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेताय? जाणून घ्या काय काळजी घ्यावी, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। क्रेडिट कार्डचे अनेक फायदे असल्याने लोक डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतात आणि बिनधास्त त्याच्या जीवावर खरेदी करतात. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुमच्या क्रेडिट लिमिटनुसार खरेदी करू शकता तर खर्च केलेले पैसे नंतर तुम्हाला ईएमआयच्या मदतीने परत करावे लागतात. यावरच बँक काही व्याजदर आकारते. दरम्यान, क्रेडिट कार्ड वापरण्याचे जसे अनेक फायदे आहेत, तसेच काही तोटेसुद्धा आहे. क्रेडिट कार्ड वापरताना अगदी सतर्क राहून वापरायला हवे काही चुक केल्यास त्याचा आर्थिक दंड भरावा लागू शकतो. म्हणजेच क्रेडिट कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुम्हांला त्याचा तोटा होऊ शकतो. पहिल्यांदा क्रेडिट कार्ड विकत घेताना काही काळजी घेणे गरजेचे असते.

नेमके कोणते क्रेडिट कार्ड घ्यावे
क्रेडिट कार्डच्या वापरचे फायद्यांप्रमाणेच काही तोटेसुद्धा आहे त्यामुळेच सतर्क राहायला हवे. वेगवेगळ्या बँक तुम्हाला आकर्षक ऑफर्स देऊन क्रेडिट कार्ड घ्यायला लावतात आणि या ऑफर्सचा ग्राहकांना फायदाही होतो. मात्र केवळ त्यासाठी घाई न करता नेमके कोणते क्रेडिट कार्ड घ्यायचे आणि त्यासाठी अर्ज करण्याआधी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

कार्ड का घ्यायचे आहे
मासिक खर्चानुसारच क्रेडिट कार्ड घेणे हे कधीही बरे तर त्या क्रेडिट कार्डची सर्व माहिती असणे गरजेचे आहे. तर क्रेडिट कार्ड संबंधित काही प्रश्न स्वतःला पडणे सुद्धा गरजेचे आहे ते म्हणजे
-क्रेडिट कार्ड घेण्याआधी मला ते का हवे आहे? असा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे.
-मला खरंच क्रेडिट कार्डची गरज आहे का? हेही तुम्ही स्वत:ला विचारले पाहिजे.
-मोठी लिमिट मिळवून मला हे क्रेडिट कार्ड खरेदीसाठी वापरायचे आहे का?
-मला क्रेडिट कार्डच्या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे का?
-या सर्व सर्व प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्डकडून मिळणाऱ्या सवलती
प्रवासावर, इंधनावर, हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च, हॉटेलमध्ये जेवणाचा खर्च यावर अनेक क्रेडिट कार्ड ऑफर देतात. त्यामुळे प्रत्येक क्रेडिट कार्डचा फायदा नेमका कसा होता आणि कुठेकुठे होतो हे जाणून घेणे गरजेचे आहे तर, प्रत्येक क्रेडिट कार्डसाठी वेगळ्या अटी असतात.

या प्रश्नांचा आढावा घ्या
अनेक क्रेडिट कार्ड्सचा पर्याय उपलब्ध असतात पण कोणते क्रेडिट कार्ड स्वतःसाठी योग्य राहील तेच विकत घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमची द्विधा मनस्थिती कमी होईल.
क्रेडिट कार्डची वार्षिक फी किती आहे?
ती मी देऊ शकतो का?
क्रेडिट कार्डच्या मदतीने तुमच्या गरजा पूर्ण होतात का?
हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणे गरजेचे आहे

या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या सोईचे आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारेच क्रेडिट कार्ड घ्यावे. ज्या क्रेडिट कार्ड्सवर वेगवेगळ्या ऑफर्स आहेत, तसेच अन्य सुविधा मिळतात असेच क्रेडिट कार्ड विकत घ्यावे पण गरज असल्यास.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *