पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका सुरूच

Spread the love

Loading

महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – 7 जूनपासून आत्तापर्यंत पेट्रोल ९ रुपयांनी वाढलं आहे. डिझेल ११ रुपयांनी महागलं आहे. 7 जूनपासून पेट्रोल-डिझेल वाढ होत आहे. 20 दिवसानंतरही पेट्रोल आणि डिझेल दरवाढ सुरुच आहे.पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. सलग 20व्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल २१ पैसे तर डिझेल १७ पैशांनी महागले आहे.

पहिल्यांदाच डिझेलच्या किमती पेट्रोलच्या तुलनेत वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीत एक लीटर डिझेलची किंमत 80.19 रुपये इतकी झाली आहे. तर पेट्रोल 80.13 रुपये इतकं आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. व्हॅट आणि उत्पादन शुल्कवाढीने डिझेलच्या किमतीत वाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलमधील दर तफावत भरुन निघाली.

पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *