नांदेडकरांना मोठा दिलासा, ३ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा… २ दिवसाआड

Spread the love

Loading

महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड – नांदेड पालिकेकडून शहरात ३ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आता विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रात पाऊस पडल्याने धरणातील पाणी पातळी वाढली आहे. यामुळे नांदेड महानगरपालिकेने 28 जूनपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने नांदेडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी रोहिणी नक्षत्रात पावसाची सुरुवात झाली. मृग नक्षत्रात पावसाने चांगला जोर धरला. विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रात परभणी व इतर भागात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पात २७ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे.

उपलब्ध पाणी शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी वापरल्यास भविष्यात आलेले पाणी साठवून राहील. या उद्देशाने प्रशासनाने शहराला तीन दिवसाऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतरही शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, परतीच्या व अवकाळी पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 100 टक्के पावसाची नोंद झाली.
त्यानंतर मनपा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. या अगोदर शहरात सुमारे ४० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या वर्षी विष्णुपुरी धरणातील पाण्यासह पैनगंगा नदीतील सहा पाळ्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *