Ranjit Singh Case: राम रहीमची निर्दोष सुटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। हरियाणातील डेराच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजित सिंग यांची २०२ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी रणजित सिंग यांच्या मुलाने २००३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रणजित सिंग हत्येप्रकरणी सीबीआय तपासाची मागणी केली होती. यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं.

याप्रकरणी २०२१ मध्ये राम रहीमसह पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आलं होतं. या प्रकरणी न्यायालयाने २००७ मध्ये आरोपींवर आरोप निश्चित केले होते. कोर्टाने राम रहीमला ३१ लाख तर इतर चार आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. सीबीआयच्या स्पेशल कोर्टात गुरमीत राम रहीमला याप्रकरणी आजन्म जन्मठेपेची शिक्षा (Haryana High Court) सुनावली होती. राम रहीम आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना ८ ऑक्टोबर २०२१ रोजी दोषी ठरवण्यात आलं होतं.

राम रहीमने सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील केलं होतं. सीबीआय न्यायालयाने २०२१ मध्ये रणजीत सिंग हत्याकांडात डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमसह (Ram Rahim) पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अवतार सिंग, कृष्णलाल, जसबीर सिंग आणि सबदिल सिंग या प्रकरणातील आरोपी आहेत. खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला होता.

रणजित सिंग हत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने डेरा प्रमुखासह अन्य चौघांची या हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. रणजित सिंग हत्या प्रकरणातील पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द करताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आजचा निर्णय दिला (Gurmeet Ram Rahim Dera Chief) आहे.

हरियाणामधून आता मोठी बातमी समोर येत आहे. रणजित सिंह हत्या प्रकरणामध्ये (Ranjit Singh Killing Case) पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा दिलाय. याप्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआय न्यायालयाने या प्रकरणी राम रहीमला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. रामरहीम सध्या दुसऱ्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *