महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। काय म्हणाल्या सोनिया दुहान?
मी शरद पवार गट सोडलेला नाही, तसंच मी दुसऱ्या पक्षात म्हणजेच अजित पवारांच्या गटात जाणार नाही. मला काल लोकांनी पाहिलं आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली. मात्र अजित पवारांच्या घरी आमदार आले तेव्हा तर सुप्रिया सुळेही तिथे होत्या. पक्ष फुटण्याच्या काही तास आधी सुप्रिया सुळेही अजित पवारांच्या निवासस्थानी होत्या. त्यांनी कुठे अजित पवारांचा पक्ष सोडला. मी कुठलाही पक्ष सोडलेला नाही. तसंच मी शरद पवारांचा पक्ष सोडणार नाही.
कोण आहेत सोनिया दुहान?
सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. तसंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याही आहेत. शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्यासंदर्भात मे २०२३ मध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत सोनिया दुहान या शरद पवारांच्या मागेच बसल्या होत्या. सोनिया दुहान या हरियाणामधल्या हिसारच्या रहिवासी आहेत. त्यांच्या तीन भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या आहेत. हिसारमध्ये सोनिया दुहान यांनी शालेय शिक्षण घेतलं आहे. यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून Bsc. केलं आहे. त्यानंतर त्या अंबाला या ठिकाणी आल्या. वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं. सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या.