Whatsapp New Feature : व्हॉट्सअपने व्हॉइस स्टेटसचं फिचर केल अपग्रेड,आता वाढणार स्टेटस टाईम लिमिट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ मे ।। Whatsapp : व्हॉट्सअप हा आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग झाला आहे. कॉल्स, व्हिडीओ कॉल्स, मेसेजेस, स्टेटस अपडेट असे अनेक फिचर आपण वापरत असतो. व्हॉट्सअप दरवेळी वापरकर्त्यांसाठी नवीनतम फिचर घेऊन येतच असतं.

पण यावेळी व्हॉट्सअपने एक फिचर अपग्रेड केलय. काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या व्हॉइस स्टेटस या फिचरची टाइम लिमिट ३० सेकंदावरून वाढवून १ मिनिट एवढी करण्यात आली आहे.

आधी 30 सेकंदाची मर्यादा असल्यामुळे काही माहिती किंवा अपडेट सांगायचे असल्यास अडचण येत होती. पण आता 1 मिनिटाची लिमिट मिळाल्याने तुम्ही तुमच्या म्हणण्याची अधिक मोकळीक मिळणार आहे.

ही नवीन सुविधा लवकरच लाखो वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या या फिचरचे अँड्रॉइड आणि iOS वर बीटा टेस्टिंग सुरू आहे, ज्यामध्ये काही त्रुटी दूर केल्या जात आहेत. आधी स्टेटस अपडेट्सकडे विशेष लक्ष दिले जात नव्हते, परंतु आता त्यांची लोकप्रियता वाढली आहे, त्यामुळे ही नवीन सुधारणा करण्यात आली आहे.

व्हॉट्सअँप स्टेटसवर व्हॉइस नोट कसा वापरायचा?
अगदी सोपं आहे. व्हॉट्सअँप चॅट स्क्रीनमध्ये चॅट बॉक्सच्या जवळ असलेल्या मायक्रोफोनच्या आयकॉनवर टॅप करा आणि तुमचा मेसेज रेकॉर्ड करा. रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर पाठवा (send) च्या बटणवर टॅप करा आणि तुमचा व्हॉइस नोट स्टेटसवर अपलोड होईल.

या नवीन फिचर अपडेटमुळे वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे व्हॉइस नोट नवीन चॅट थीम कलर फीचरचा वापर करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *