महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ मे ।। आयकर विभागाने आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नवीन अधिसूचना जाहीर केली आहे. करदात्याने दिलेल्या तारखेपर्यंत आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास दुप्पट टीडीएस भरावा लागणार आहे. यासाठी ३१ मे ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे दुप्पट टीडीएसपासून वाचण्यासाठी आजच ही प्रोसेस पूर्ण करणे आवश्यक आहे.
फक्त २ दिवस शिल्लक
पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. पुढील सर्व आर्थिक कामांमध्ये याची गरज भासणार आहे. त्यासाठी आयकर विभागाने या आधी देखील तारीख वाढवून दिली होती. मात्र अनेक व्यक्तींनी ही कामे पूर्ण न केल्याने तारीख पुन्हा वाढवण्यात आली. त्यामुळे दंड भरावा लागू नये यासाठी तुम्ही आजच पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केले पाहिजे. आता यासाठी फक्त २ दिवस शिल्लक आहेत.
असे करा लिंक
आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करणे फार सोप्प आहे.
त्यासाठी आधी आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.
पुढे ‘Quick Links’ वर क्लिक केल्यानंतर ‘Link Aadhaar’ हा पर्याय निवडा.
पुढे पॅनकार्ड आणि आधारकार्डवरील क्रमांक टाका. त्यानंतर वॅलिडीटीवर क्लिक करा.
पुढे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकल्यावर लिंक आधारवर क्लिक करा.
मोबाईल नंबरवरील ओटीपी आल्यावर तो प्रविष्ट करा. त्यानंतर तुमचं आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक होईल.
पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्यासाठी आयकर विभागाने एक नोटीस जाहीर केलं आहे. त्यानुसार शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे. या तारखेनंतर ज्या व्यक्ती आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करतील त्यांना दुप्पट टीडीएस भरावा लागेल असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे या २ दिवसांत तुम्ही आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक न केल्यास तुम्हाला दुप्पट टीडीएस भरावा लागू शकतो.