Weather Update : राज्यात उष्णतेचा कहर कायम ; मान्सून 24 तासांत केरळात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे ।। पोषक वातावरणामुळे येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, मान्सूनच्या दुसर्‍या शाखेने जोरदार प्रगती करीत ईशान्य भारतामधील काही राज्यांकडे वेगाने प्रगती करण्यास सुरुवात केली आहे. मान्सून पुढे सरकण्यास सध्या चांगली स्थिती असल्यामुळे लवकरच अरबी समुद्रामार्गे तळकोकण, गोवा आणि कोकणच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे.

राज्यात उष्णतेचा तडाखा कायम
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला तीव्र उष्णतेचा तडाखा कायम असून, बुधवारी राज्यात ब्रम्हपुरी या शहराचा कमाल तापमानाचा पारा 45.2 अंश सेल्सिअवर पोहोचला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकणासह मुंबई, पालघर, रायगड, ठाणे या भागात दमट आणि उष्ण हवामान राहणार आहे, तर विदर्भात तीव्र उष्णतेची लाट राहणार आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. दरम्यान, 31 मे पासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात वळवाचा पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *