महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे ।। मुंबईतील शहरातील शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. या कामामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानच्या अनेक रेल्वे गाड्याच्या फेऱ्या रद्द् करण्यात आलेल्या आहेत. यामुळे पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.
मुंबईतील शिवाजी महाराज टर्मिनलच्या प्लॅटफॉर्म(platforms) आणि रुळाच्या कामाच्या विस्तारीकरणासाठी दोन दिवस पुणे मुंबई रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. डेक्कन क्वीनसह प्रगती एक्सप्रेस आणि सिंहगड , इंटरसिटी पुणे आणि अनेक गाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. यात तब्बल २९ रेल्वे गाड्या रद्द् करण्याचा रेल्वे प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे.
कोणत्या रेल्वे रद्द
दररोज असंख्य व्यक्ती मुंबई- पुणे प्रवास करत असतात. त्यामुळे दररोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस ३१ मे पासून ते २ जूनपर्यंत रद्द करण्यात आली असून पुणे- मुंबई(Mumbai)-पुणे प्रगती एक्सप्रेस २८ ते २ जून या कालावधीत रद्द करण्यात आलीय. डेक्कन क्वीन ,कुर्ला-मडगाव- कुर्ला या रेल्वे गाड्या १ ते २ जूनच्या कालावधीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
येत्या महिन्याच्या १ जूनला डेक्कन क्वीनला तब्बल ९४ वर्षे पूर्ण होणार आहेत. दरवर्षी या गाडीने दररोजचा प्रवास करणारे प्रवासी केक कापून या डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करत असतात. मात्र या वर्षी वाढदिवसा वेळी डेक्कन क्वीनचा प्रवास रद्द करण्यात आलेला आहे.
लोकल सेवेला फटका
मध्य रेल्वे मार्गावरही जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे आणि सीएसएमटी या स्थानकांवर ९९ तासांता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ठाणे रेल्वे स्थानकावर ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या मेगाब्लॉक कालावधीमध्ये ९३० लोकल फेऱ्या आणि ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकातील गर्दी आणि प्रवाशांची असुविधा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी द्या, असे आवाहन मध्य रेल्वेने सर्व सरकारी आणि (Private) खासगी ऑफिसला केली आहे.