Gold Silver Price Today: दरवाढीननंतर सोन्या-चांदीचा रंग फिका पडला; ग्राहकांना खरेदीची संधी, पाहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मे ।। सोन्या आणि चांदीने मागील तीन महिन्यात दरवाढीचा उच्चांक गाठला. तर गेल्या आठवड्यात सोन्याने प्रति ग्रॅम ७५ हजार रुपयांच्या उच्चांकावर उसळी घेतली असून चांदीची किंमतही ९६ हजारांच्या घरात पोहोचली. तर या चालू आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी चढाई केली मात्र आठड्याच्या शेवटी आता दरवाढीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे ज्यामुळे ग्राहकांना नाममात्र दिलासा मिळाला आहे.

सोन्याचे दर नरमले, चांदी झाली स्वस्त
सोने आणि चांदीच्या फ्युचर्स किंमतीत शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटची नरमाई दिसून आली तर दोन्ही मौल्यवान धातूच्या वायदे किंमती घसरल्या आहेत. बुधवारी चांदीच्या वायदेच्या किमतीने उच्चांक गाठला पण त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी भाव कमी झाल्याचे दिसून आले आहेत. सोन्याचा वायदा भाव ७२ रुपयांच्या आसपास व्यापार करत असताना चांदीची किंमत ९३,००० रुपयांवर ट्रेंड कात आहे. दुसरीकडे, जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या वायदे घसरत आहेत.

सोन्याचे फ्युचर्स घसरले
सोन्याच्या वायदा किंमतीत बाजाराच्या सुरुवातीला मंदी दिसून आली आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे ऑगस्ट फ्युचर्स १२८ रुपयांनी घसरून ७२,०८८ रुपये झाले तर सध्या घसरण आणखी वाढली आणि १८९ रुपयांनी स्वस्त होऊन सोन्याचा प्रति १० ग्रॅम वायदा ७२,०२७ रुपयांवर व्यापार आहेत आहे. अलीकडच्या दिवसांत सोन्याचा वायदा दर ७४,४४२ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता.

चांदीची चमक फिकी पडली
दुसरीकडे, सोन्यापाठोपाठ चांदीच्या वायदेची आज सुरुवातीला नरमले. MCX वर चांदीचा जुलै वायदा शुक्रवारी २७३ रुपयांच्या घसरणीसह ९३,८५० रुपयांवर ओपन झाला तर सध्या १,०७७ रुपयांनी घसरून घसरणीसह ९३,०४६ रुपयांवर व्यापार करत होता. या आठवड्यात बुधवारी चांदीचा भाव ९६,४९३ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे, गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार २२ आणि २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही, तर चांदीचा भाव १००० रुपयांनी कमी झाला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमधील सोने-चांदीचा दर…

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर काय
शहराचे नाव आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७२,७६० रुपये ७२,७६० रुपये
पुणे ७२,७६० रुपये ७२,७६० रुपये
नागपूर ७२,७६० रुपये ७२,७६० रुपये
कोल्हापूर ७२,७६० रुपये ७२,७६० रुपये
जळगाव ७२,७६० रुपये ७२,७६० रुपये
ठाणे ७२,७६० रुपये ७२,७६० रुपये

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहराचे नाव आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ६६,७०० रुपये ६६,७०० रुपये
पुणे ६६,७०० रुपये ६६,७०० रुपये
नागपूर ६६,७०० रुपये ६६,७०० रुपये
कोल्हापूर ६६,७०० रुपये ६६,७०० रुपये
जळगाव ६६,७०० रुपये ६६,७००० रुपये
ठाणे ६६,७०० रुपये ६६,७०० रुपये

चांदीचा आजचा दर
शहराचे नाव आजचा चांदीचा भाव (प्रतिकिलो) कालचा चांदीचा भाव (प्रतिकिलो)
मुंबई ९५,५०० रुपये ९६,५०० रुपये
पुणे ९५,५०० रुपये ९६,५०० रुपये
नागपूर ९५,५०० रुपये ९६,५०० रुपये
कोल्हापूर ९५,५०० रुपये ९६,५०० रुपये
जळगाव ९५,५०० रुपये ९६,५०० रुपये
ठाणे ९५,५०० रुपये ९६,५०० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *