महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मे ।। सोनं खरेदी (Gold) करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सध्या भारतात दिवसेंदिवस सोन्या चांदीचे दर (Gold Price) वाढत आहे. यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ लागत आहे. दरम्यान, तुम्हाला माहित आहे का? की भारताच्या सोन्यापेक्षा दुबईचं सोनं (Dubai Gold Price ) स्वस्त आहे. तुम्ही एकावेळी तुमच्यासोबत किती सोनं आणू शकता याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
दुबईला ‘सोन्याचे शहर’ असंही म्हटलं जातं. दुबईला भेट देणारे भारतातील लोक सोन्याची खरेदी करतात. कारण लोकांचा असा विश्वास आहे की तिथे सोने स्वस्त आहे. अशा परिस्थितीत, भारताच्या तुलनेत दुबईमध्ये सोने किती स्वस्त आहे आणि तेथून तुम्ही किती सोने घरी आणू शकता हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
भारत आणि दुबई या दोन्ही देशात सोन्याच्या दरात किती फरक?
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होत चालले आहे. पण त्याचवेळी असाही एक देश आहे जिथे सोने भारतापेक्षा खूपच स्वस्त आहे. भारताच्या तुलनेत दुबईत सोने स्वस्त आहे. हे आयात शुल्कामुळे आहे. भारतात जिथे सोने आयात करण्यासाठी शुल्क भरावे लागते. त्याचबरोबर दुबईत सोन्यावर आयात शुल्क नाही. जेव्हा जेव्हा कोणी नातेवाईक किंवा मित्र दुबईला जातात तेव्हा लोक तिथून सोने नक्कीच मागवतात. मात्र, दुबईतून किती सोने आणता येईल याबाबत काही नियम आहेत. दुबईमध्ये सोन्याची किंमत दिरहम 263.25 प्रति ग्रॅम आहे. जी भारतीय चलनात 5969 रुपये आहे. त्याच वेळी, भारतात एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,670 रुपये आहे.
तुम्ही भारतात किती रुपयांच दागिणे घेऊन येऊ शकता?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षाहून अधिक काळ परदेशात राहणाऱ्या भारतीय प्रवाशाला 50000 रुपये किमतीचे 20 ग्रॅमपर्यंतचे दागिने तुम्ही शुल्कमुक्त आणू शकता. किंवा 40 ग्रॅमपर्यंतचे 1,00,000 रुपये किंमतीचे दागणि तुम्ही शुल्कमुक्त आणू शकता. भारतात येणाऱ्या प्रवाशांनी विहित मर्यादेपेक्षा जास्त सोन्याचे दागिने घेऊन गेल्यास, त्यांना सोन्यावर काही सीमाशुल्क भरावे लागेल. याशिवाय एक वर्षाहून अधिक काळ परदेशात राहिलेली मुले दुबईतून करमुक्त सोन्याचे दागिने घेऊ शकतात. मात्र, ते सोन्याची नाणी, बार किंवा बिस्किटे घेऊन जाऊ शकत नाहीत.