Gas Cylinder : LPG गॅस सिलिंडर झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुन ।। लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना सिलिंडर वापरकर्त्यांना गिफ्ट देण्यात आले आहे. ऑईल मार्केटिंग कंपनीने एलपीजी सिलिंडरच्या किंमती ७२ रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा म्हणाला लागेल. १ जूनपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये ६९.५० रुपये, कोलकातामध्ये ७२ रुपये, मुंबईमध्ये ६९.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ७०.५० रुपये स्वस्त झाला आहे. किंमतीमधील ही घट फक्त व्यावसायिक सिलिंडरसाठी असणार आहे. घरगुती सिलिंडरसाठी तूर्तास कोणताही दिलासा नसून ते जुन्याच दरांमध्ये मिळतील.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहेत. त्यातच १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडर वापरकर्त्यांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. दिल्लीमध्ये १७४५.५९ रुपयांना सिलिंडर मिळत होता तो आता १६७६ रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये १८५९ रुपयांना मिळणारे सिलिंडर १७८७ रुपयांना मिळेल. विशेष म्हणजे आज पश्चिम बंगालमध्ये मतदान आहे.

मुंबईमध्ये कालपर्यंत १६९८.५० रुपयांना असणारे सिलिंडरआजपासून १६२९ रुपयांना मिळेल. चेन्नईत सिलिंडर १८४०.५० रुपयांना मिळेल, तो आधी १९११ रुपयांना मिळत होता. त्यामुळे १९ किलो सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या लोकांनासाठी ही आनंदाची गोष्ट मानावी लागेल.

योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये गॅस सिलिंडरची किंमत १८४६ रुपये असेल. मात्र, १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८६५ रुपये आहे. त्यामुळे १४ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीमध्ये घट होण्यासाठी सर्वसामान्यांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *