Deccan Queen 95th Birthday: ‘डेक्‍कन क्‍वीन’चे 95 व्या वर्षात पदार्पण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुन ।। मुंबई-पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन 1 जूनला 95 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 1930 मध्ये मध्य रेल्वे मार्गावर ही पहिली डिलक्‍स गाडी धावली होती.

सुरुवातीला सात डब्यांसह दोन रॅकने ही गाडी धावत होती. नंतर डब्यांची संख्या 17 वर पोहचली. त्यातील एक रॅक स्कारलेट मोल्डिंगसह चंदेरी रंगात; तर दुसरा रॅक सुवर्ण रेषांसह निळ्या रंगात रंगवण्यात आला. मूळ रॅकच्या डब्याच्या आतील फ्रेम इंग्लंडमध्ये तयार करण्यात आली आहे, तर गाडीचे डब्बे मध्य रेल्वेच्या माटुंगा कारखान्यात तयार झाले.

या गाडीच्या प्रथम श्रेणीतील पाच जुने रॅक बदलून धुळमुक्त 65 प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा करण्यात आली. द्वितीय श्रेणीतील नऊ आसनांऐवजी 120 आसने तयार करण्यात आली. त्यामुळे नव्या रॅकमध्ये 1,417 आसने झाली. तसेच, या गाडीतील भोजनालयात 32 प्रवासी बसू शकतील अशी व्यवस्था आहे. त्यात विविध अत्याधुनिक सुविधाही आहेत.

अशी आहेत डेक्कन क्वीन ट्रेनची विशेष वैशिष्टे
जुन्या रेकमधील 5 फर्स्ट क्लास चेअर कारच्या जागी 5 एसी चेअर कारमध्ये बदलण्यात आले, ज्यामुळे धूळमुक्त वातावरणात 65 अतिरिक्त आसन क्षमता आहे. तसेच 9 – द्वितीय श्रेणीच्या चेअर कार जुन्या डब्यांच्या तुलनेत 120 आसनांची अतिरिक्त आसन क्षमता आहे.अशा प्रकारे, जुन्या रेकमध्ये 1232 जागांच्या तुलनेत नवीन रेकमध्ये एकूण 1417 आसनक्षमता केली आहे, म्हणजेच 15% ने वाढ झाली आहे.

डायनिंग कार 32 प्रवाशांसाठी टेबल सेवा आणि मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर आणि टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा आहेत. डायनिंग कार देखील कुशनच्या खुर्च्या आणि कार्पेटने सुसज्ज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *