महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुन ।। केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अगदी तरुण मुला-मुलींमध्ये केस पांढरे होण्याच्या समस्या आहेत. पांढरे केस झाल्यावर आपलं वय जास्त आहे असं वाटतं. त्यामुळे सर्वजण डाय वापरतात. मात्र डाय जास्त केमिकलपासून बनवलं जातं. त्यामुळे केस काळे होतात, मात्र ते जास्त दिवस टिकत नाही. अगदी आठवडाभरातच केस पुन्हा पांढरे दिसू लागतात.
केस पांढरे झाले की पुन्हा डाय लावला जातो. मात्र सतत डाय लावल्याने केस जास्त खराब होतात. केस जास्त गळतात आणि विरळ होतात. इतकंच नाही तर काही व्यक्तींना डायमुळे अंधत्व सुद्धा येतं. आता सध्याच्या युगात चंत्रज्ञान पुढे गेलं आहे त्यामुळे आपण डाय लावतो. मात्र पूर्वीच्या काळी देखील व्यक्तींचे केस पांढरे होत असतील तर तेव्हा या व्यक्ती कोणत्या डायचा वापर करत असतील असा प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी आलाच असेल. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी तब्बल १०० वर्षे जुना रामबाण उपाय शोधला आहे.
साहित्य
१ वाटी जायफळ
१ वाटी वेलची
२ चमचे मेथीचे दाणे
मुठभर कडीपत्त
आवश्यकतेनुसार पाणी
कृती
सर्वात आधी एक वाटी घ्या. वाटी थोडी मोठी घ्या जेणेकरून वरील सर्व सामग्री एकत्रीतपणे यात मावेल. त्यानंतर यामध्ये जायफळ, वेलची, मेथीचे दाणे, कडीपत्ता आणि पाणी मिक्स करून रात्रभर तसेच ठेवा.
दुसऱ्या दिवशी एका मोठ्या पातेल्यात किंवा कढईत भिजलेल्या सर्व गोष्टी काढून घ्या.
त्यानंतर जायफळ आणि अन्य सर्व गोष्टी कुसकरून घ्या.
पुढे यातील बिया किंवा जाड राहिलेला भाग काढून टाका आणि रस गाळून घ्या.
सर्व गोष्टी ज्या पाण्यात भिजत ठेवल्या होत्या ते पाणी देखील घ्या.
दररोज अंघोळीला जाण्याआधी केसांवर हे पाणी लावा.
आढवड्यातून किमान २ वेळा तरी या पद्धतीने केस स्वच्छ करा.
ही ट्रिक वापरल्याने तुमचे केस हळूहळू महिन्याभरात काळे होतील. इतकेच नाही तर केस गळणे देखील बंद होईल. तसेच केस जाड आणि घट्ट होतील.
टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. हा उपाय करून केस काळे होतीलच असा दावा करत नाही.