कोणत्याही धर्माला दुखावण्याचा मुलाचा हेतू नाही – स्टॅलिन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ सप्टेंबर । सनातन धर्माबद्दल मुलगा उदयनिधींनी केलेल्या विधानावर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अखेर मौन सोडले. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मातील भेदभावावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांचा कोणत्याही धर्माला अथवा श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नव्हता, असे स्टॅलिन यांनी सध्या सनातनवर सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.


उदयनिधी यांनी सनातन धर्मात दलित, आदिवासी आणि महिलांबरोबर होणाऱया भेदभावावर मत व्यक्त केले. सनातन धर्मातील शोषण करणाया या गोष्टींवर बोलणे भाजपच्या समर्थकांना सहन झाले नाही. त्यामुळे उदयनिधी यांनी सनातनी लोकांचे हत्याकांड (नरसंहार) केल्याचा भाजप समर्थकांनी खोटा प्रचार केला. उदयनिधी यांनी तमीळमध्ये किंवा इंग्रजीत नरसंहार असा शब्द वापरला नाही, असेही स्टॅलिन यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *