अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पिंपरीत “मनुस्मृती दहन” आंदोलन करण्यात आले

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24- ऑनलाईन- इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या पाठ्यक्रम शालेय शिक्षण विभागाकडून तयार केलेला असून यामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश अभ्यासक्रमात केल्याने पुन्हा एकदा चातुवर्ण्य, अंधश्रद्धा याला खतपाणी घालण्याचे व समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत होत आहे.


तसेच शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा चंचुप्रवेश कोणालाही मान्य नसून कदापिही त्याचा समावेश केला जाता कामा नये, आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, ही सर्वमान्य समाज भावना प्रतिकात्मकरित्या सरकारला समजावी, यासाठी *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक- पिंपरी* येथे आज म्हणजे *वार- शुक्रवार, दिनांक- ३१ मे २०२४* रोजी, *सकाळी १० वाजता* तेथे *मनुस्मृती दहन* हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारावंत मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भुजबळ, नगरसेवक तुषार कामठे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, माजी नगरसेविका गिरीजा कुदळे, समता परिषदेच्या महिला शहराध्यक्षा वंदना जाधव, कार्याध्यक्ष पांडुरंग महाजन, नकुल महाजन, ॲड. विद्या शिंदे, प्रदीप पवार, देवेंद्र तायडे, सुरेश गायकवाड, सतीश काळे, धम्मराज साळवे, प्रतिभा बनसोडे, संतोष माळी, प्रवीण कदम, प्रकाश जाधव, डॉ. मनीषा गरुड, विशाल जाधव, गौरव चौधरी, वैभव जाधव, दिलीप गावडे, मंगला मुनेश्वर, अपर्णा दराडे, गणेश दराडे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *