महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजपसाठी सर्वात हक्काची जागा मानली जाणारी वाराणसी येथे भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, सुरुवातीच्या निकालांमध्ये नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.
नरेंद्र मोदी हे ४०८९ मतांनी पिछाडीवर आहेत. अजय राय यांना आतापर्यंत १८६३९ इतकी मतं पडली आहेत, तर नरेंद्र मोदी यांना फक्त १४५४० मतं पडली आहेत.
वाराणसीमध्ये लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर होते. तर, काँग्रेसचे अजय राय दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, आता मोदी पिछाडीवर गेले आहेत.
