महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल स्पष्ट होऊ लागले आहेत. सुरुवातीच्या कलानुसार इंडिया आघाडी चांगली टक्कर देताना दिसत आहे. भाजपच्या नेतृत्त्वातील इंडिया आघाडीने निवडणुकीपूर्वी ४०० पारचा नारा दिला होता. पण, एनडीएसाठी हे स्वप्नच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, सध्याच्या कलानुसार एनडीए तीनशे जागांच्या जवळपास आहे, तर इंडिया आघाडी २०० च्या जवळपास जागा मिळताना दिसत आहे.
सुरुवातीच्या कलानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही ३०० जागांपेक्षा कमी जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसने २०० चा आकडा स्पर्श केला आहे. एक्झिट पोलनुसार भाजपला मोठ्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, सुरुवातीच्या कलानुसार हे सध्यातरी शक्य होत नसल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशात भाजपला धक्का बसत असल्याचं दिसत आहे.
उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. त्यातील ३५ जागांवर सपाने आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये भाजप २२ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे बंगालमध्ये भाजपने चांगली मुसंडी मारली असं म्हणावं लागेलय
महाराष्ट्रात महाविकास आघाडी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत होईल असं बोललं जात होतं. सध्याच्या कलानुसार, महाविकास आघाडी २६ जागांवर आघाडीवर आहे, तर महायुती १० जागांवर आघाडीवर आहे. इतरांना २ जागा मिळताना दिसत आहे.
