Business News : महागाईचा भडका ; निकालाच्या दिवशीच जीवनावश्यक वस्तू महागल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। आज लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झालीये. अशात सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढणारी माहिती समोर आली आहे. प्रत्येक घराघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गृहउपयोगी वस्तू म्हणजे फ्रिज, वॉशिंग मशीन यांवर जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत. २ ते ५ टक्क्यांनी सर्वच वस्तुंवरील किंमती वाढवण्यात आल्यात.

इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, होम अप्लायन्स निर्माता सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने गुरुवारी आपल्या बिझनेस पार्टनर्सला इनपुट खर्च वाढल्याचे सांगितले होते. इनपुट खर्च वाढल्याने आता सर्व वस्तुंवरील खर्च वाढत आहेत.

हॅवेल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनिल राय गुप्ता यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तिमाहीत तांबे आणि ॲल्युमिनिअमच्या किंमती वाढल्या आहेत. परिणामी एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरच्या किंमती सुद्धा ५ ते ७ टक्क्यांनी वाढताना दिसत आहेत.

रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह यासह अन्य इलेक्ट्रिक वस्तूंवरील किंमतींमध्ये २ ते ५ टक्क्यांनी वाढ होत आहे. महागाईचा भडका उडाल्याने सामान्यांच्या खिशाला याने कात्री लागताना दिसतेय. अन्नधान्याच्या किंमतींध्ये तांदूळ आणि डाळींचे दर वाढले आहेत. तर पालेभाज्यांच्या किंमतीही वाढल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *