![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोन्यासह चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळालं आहे. त्यामुळ खरेदीदारांच्या खिशाला झळ बसली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,२६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,४४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९२,३४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९१,२८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,११९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,१३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,११९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१३० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,११९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१३० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,११९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१३० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)![]()
