महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०२३ मध्ये शिवसेनेप्रमाणेच फूट पडली. अजित पवार यांनी बहुसंख्य आमदारांना घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला. राष्ट्रवादीचे तीन विद्यमान खासदार शरद पवार गटाकडे होते, तर एक खासदार अजित पवार गटाबरोबर राहिले. लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर शरद पवार गटाने महाविकास आघाडीकडून निवडणूक लढताना १० जागा आपल्या पारड्यात पाडून घेतल्या होत्या. या दहा जागांपैकी तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे. तर अजित पवार गटाने फक्त रायगडमध्ये आघाडी घेतली आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
दिंडोरीमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांनी भाजपाच्या खासदार भारती पवार यांच्यावर मोठे मताधिक्य मिळवले आहे. तब्बल ३० हजारांची आघाडी त्यांनी घेतल्याचे दाखवत आहे. बारामतीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी आठ हजारांचे मताधिक्य घेतले आहे. सकाळपासून झालेल्या फेऱ्यामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.
