मायलेज २५.७५ किमी; ‘या’ ५ सीटर कारनं केलं सर्वाचं मार्केट जाम ! देशात तुफान मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुन ।। गेल्या काही वर्षापासून भारतीय बाजारात गाड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. बाजारात सर्वाधिक विक्री होण्यासाठी कारमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. आता बाजारात स्वस्त किमतीत चांगल्या फीचर्सच्या अनेक गाड्या आल्या आहेत. यामुळे बजेट सेगमेंटचा बादशाह असलेल्या मारुती वॅगन आरलाही खडतर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. जर आपण मागील महिन्याबद्दल (मे २०२४) बोललो तर, दर महिन्याला टाॅपवर असलेली मारुती वॅगन आर आता पहिल्या क्रमांकावरुन घसरली आहे.

मारुती सुझुकी वॅगन आरला मागे टाकून गेल्या महिन्यात स्विफ्टने (नवीन मारुती स्विफ्ट) नंबर एकचा क्रमांक आपल्या नावी केला आहे. स्विफ्टची गेल्या महिन्यात एकूण १९,३३९ युनिट्सची विक्री झाली होती. मे २०२४ मध्ये WagonR ची सर्वाधिक १७,८५० युनिट्सची विक्री झाली होती. कंपनीने नुकतेच स्विफ्टचे नवीन जनरेशन मॉडेल लाँच केले आहे. मारुती सुझुकी स्विफ्टची वैशिष्ट्ये, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल तपशीलवार माहिती घेऊ…

कशी आहे नवीन मारुती स्विफ्ट?
जर आपण अपडेट केलेल्या Maruti Suzuki Swift (2024 Maruti Swift) च्या इंजिनबद्दल बोललो तर, त्यात १.२-लिटर ३-सिलेंडर Z-सीरीज पेट्रोल इंजिन आहे जे ८२bhp ची कमाल पॉवर आणि ११२Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कारचे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. स्विफ्टच्या पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये २४.८ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. तर मारुती स्विफ्टच्या पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटचे मायलेज २५.७५ किमी प्रति लीटर आहे.

जबरदस्त वैशिष्ट्यांसह सुसज्ज
अपडेटेड मारुती स्विफ्टच्या केबिनमध्ये तुम्हाला ९-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस फोन चार्जिंग आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. याशिवाय, सुरक्षेसाठी, कारमध्ये स्टँडर्ड ६-एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. बाजारात मारुती स्विफ्टची स्पर्धा Hyundai Grand i10 Nios शी आहे.

या कारमध्ये ऑल-ब्लॅक इंटिरिअर थीम देण्यात आली आहे. यामध्ये ४० हून अधिक कार कनेक्टेड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. कारमध्ये ९ इंचाचा स्मार्ट प्रो प्लस इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. याशिवाय कारमध्ये वायरलेस चार्जिंग, मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, वाईड एंगल रिअर व्ह्यू कॅमेरा, रिअर एसी वेंट, १६-इंचाची ड्युअल टोन अलॉय व्हील्स,डिजिटल AC पॅनल, टाईप-A आणि टाईप्स-C USB चार्जिंग पोर्ट्स, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, LED टेललॅम्प्स आणि LED फॉग लॅम्प सारखी फीचर्सची रेलचेल आहे.

किंमत किती आहे?
अपडेटेड मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग सुरू असून त्याची डिलिव्हरीही केली जात आहे. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत ६.४९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ९.६४ लाख रुपयांपर्यंत जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *