31 चा मायलेज, स्पोर्टी लूक, 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या 2 कार्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुन ।। भारतीय कार बाजारात एंट्री लेव्हल कारची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. या पाच सीटर कार अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्ससह येतात. Maruti Alto K10 आणि Renault Kwid या दोन स्मार्ट कार 5 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात उपलब्ध आहे. मारुती सुझुकी आपल्या कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देत आहे. या दोन्ही कार्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

Maruti Alto K10
ही कार 5 स्पीड ट्रान्समिशनसह येते. यात स्टायलिश टेल लाईट आणि स्पीड अलर्ट सिस्टीम सारखी अॅडव्हान्स फीचर्सआहेत. ही कार सीएनजी इंजिनमध्ये देखील येते. कंपनीचा दावा आहे की, ही कार सीएनजीवर 31.59 किमी/किलो पर्यंत सहज मायलेज देते. यात इंटिग्रेटेड स्पॉयलर आणि हाय-माउंट स्टॉप लॅम्प आहे. ज्यामुळे ही कार अधिक आकर्षक दिसते. रायडरच्या सेफ्टीसाठी या कारमध्ये एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे.

Alto K10 मिळतात हे जबरदस्त फीचर्स
ही कार 60 लीटर सीएनजी सिलेंडरसह येते. Alto K10 पेट्रोलवर 24.39 kmpl पर्यंत मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. यात सात प्रकार आहेत. यात अलॉय व्हील्स आणि 5 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हाय पिकअपसाठी कार 66 bhp पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते.

Renault Kwid
Renault Kwid च्या बेस मॉडेलची किंमत 4.69 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. ही कार स्पोर्टी लूक आणि ड्युअल टोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट यांसारखी जबरदस्त फीचर्स आहेत. हिल स्टार्टमुळे पर्वतांवर कार नियंत्रित करणे सोपे होते.

Maruti Alto K10 And Renault Kwid
Kwid मध्ये मिळतात हे फीचर्स
यात चार एअरबॅग्ज आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आहे. कारमध्ये 999 सीसी इंजिन आहे. यात रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. कारमध्ये 8-इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. ही कार अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *