vegetables prices News: भाजीपाल्याचे दर कडाडले ; सामान्य नागरिक हैराण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुन ।। दिवसेंदिवस उणाचा चटका वाढत असून या उकाड्याने नागरिक देखील हैराण आहेत. अशातच उन्हाळा संपत आला असून पावसाळ्याला सुरुवात होत आहे. मात्र सध्या मे आणि जून महिन्यातील कडक उन्हाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या पिकावर झाला आहे. काही दिवसात भाजीपाल्याचे दर आणखी वाढणार आहेत. त्यामुळे भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच जाणार आहे.

जून महिन्याला सुरुवात झाली आहे तरी नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागतोय. यंदा नागरिकांना उष्णेतस भीषण पाणीटंचाईचाही समस्याला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम भाजीपाल्यांना बसलाय. शेतात यंदा कडक उन्हामुळे भाज्यांचे (vegetables)उत्पादन घटले त्यामुळे बाजारातही भाज्यांची आवक कमी असल्याने त्यांची मागणी वाढली आणि त्यामुळं भाजीपाल्यांचे दर देखील कडाडले.

भाजीपाल्यांचे दर हे सध्या वाढले असून सर्वच भाज्या सरासरी ८०ते १०० रुपये किलो दराने विकत असून ग्राहकांच्या (Customers)खिशाला कात्री बसत असल्याने त्यांनी सुद्धा आता भाजीपाला खरेदी करण्याकडे पाठ फिरवल्याच दिसून येतय. उन्हाचा प्रचंड तडाखा त्याचबरोबर पाण्याची कमतरता यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन हे कमी होत असून मार्केटमध्ये सुद्धा त्याची आवक ही कमी झालेली असल्याने विक्रीवर परिणाम झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *