E- Bike : वाहतुकीसाठी सर्वोत्तम पर्याय; एका चार्जिंगमध्ये ११० किलोमीटर धावणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुन ।। : वाहतुकीसाठी इंधनाचा वाढता खर्च आणि परवडणाऱ्या वैयक्तिक वाहतुकीचा अभाव या समस्येवर उपाय म्हणून ‘कायनेटिक ग्रीन’ने ‘ई-लुना’चा (इलेक्ट्रिक व्हेईकल) पर्याय उपलब्ध केला आहे.

बाजारपेठेतील महागड्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत अधिक स्टायलिश आणि मजबूत ‘ई-लुना’ प्रतिमहिना २,५०० रूपयांपेक्षा कमी हप्त्यात उपलब्ध होऊ शकते. ती ७९,९९० रुपये (एक्स शोरूम पुणे) किमतीत उपलब्ध आहे.

एका चार्जिंगमध्ये ती ११० किलोमीटर धावते. याचा खर्च १० पैसे प्रती किलोमीटर आहे. यासोबतच मजबूत बांधणीमुळे ई-लुना १५० किलोपर्यंतचा भार सहन करू शकत असल्याने दैनंदिन प्रवासापासून ते वितरणापर्यंत विविध गरजांसाठी हा एक व्यावहारिक पर्याय आहे.

विशेष म्हणजे ई-लुना ही पाच वर्षांच्या विस्तारित वॉरंटीसह उपलब्ध आहे. समाजातील सर्व घटकांसाठी आर्थिक संधीची दारे खुली करणारी ई-लुना हे ‘ईव्ही’ क्रांतीमधील भारताच्या आत्मनिर्भरता व क्षमतेचा पुरावा आहे. ‘ईव्ही’ केवळ पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक नसून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारीही असू शकते, हे ई-लुनाने सिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *