महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुन ।। Job Layoffs : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची क्षमता वाढवण्यासाठी गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सध्या वेगवेगळ्या विभागांचे पुनर्गठन करत आहेत. याच पुनर्गठनाचा एक भाग म्हणून या दोन्ही कंपन्यांनी सुमारे 1000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून टेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कपात सुरू आहे. याच मालिकेत आता गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांनीही आपापल्या संस्थेत सुमारे 1000 लोकांची कपात केली आहे. वृत्तानुसार, गुगल क्लाउड विभागातून सुमारे 100 तर मायक्रोसॉफ्टमधून सुमारे 1000 कर्मचाऱ्यांना कंपनी सोडण्यास सांगितले आहे.
AI क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी या दोन्ही कंपन्या मोठ्या प्रमाणात बदल करत असूनही अशा प्रकारच्या कपातमुळे बाजारात चिंता निर्माण होतेच.
वृत्तानुसार, खर्च कमी करण्यासाठी गुगल क्लाउडने त्यांच्या सेल्स आणि इंजिनियरिंग विभागातील सुमारे 100 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या वर्षी आतापर्यंत गुगलने वेगवेगळ्या विभागांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये काही भारतीय आणि मेक्सिकन शाखांमध्ये काम करणाऱ्या इंजिनियरचाही समावेश आहे.
कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकत्याच झालेल्या एका आंतरिक मेमोनंद्वारे या बदलांची माहिती दिली होती. पिचाई यांनी असेही म्हटले आहे की, 2024 च्या मध्यापर्यंत कपात कमी होईल, पण त्यांचे हे शब्द खरे ठरतील का हे हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे.