Maharshtra Politics : लोकसभेच्या निकालानंतर वारं फिरलं! एकनाथ शिंदेंचे अनेक आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुन ।। लोकसभा निकालानंतर राज्यात राजकीय समीकरण बदलल्याचं दिसत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. शिंदेच्या शिवसेनेत गेलेले ५ ते ६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती साम टीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे. ते लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे.

राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिंदे गटाचे सहा आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती (Maharashtra Politics) मिळत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. आता ते पाच ते सहा आमदार नेमके कोण आहेत? असा प्रश्न सर्वांना पडत आहे.

लोकसभेच्या निकालानंतर राज्यात विधानसभेचं गणित बदललं आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत. ते आता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत (Shinde Shiv Sena MLA) आहे. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या जागांवरील गणित बदलणार असल्याचं दिसत आहे. मुंबईत एकूण ३६ विधानसभेच्या जागा आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला २० जागा, तर महायुतीला १६ जागांवर विजय मिळाला आहे. याचा परिणाम आता शिंदे गटावर होताना दिसत आहे.

महाविकास आघाडीने मुंबईत लोकसभेच्या सहा जागांपैकी चार जागांवर विजय मिळवला, तर दोन जागा महायुतीने जिंकल्या आहेत. भाजपचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची आघाडी (Uddhav Thackeray Group) पाहायला मिळाली आहे. त्यामुळे कुठेतरी शिंदे गटाच्या आमदारांमध्ये आता महायुतीबद्दल अविश्वास कुठेतरी दिसत आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी परत ठाकरे गटात परतण्याचा निर्णय घेतला असल्याचा, अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी फेटाळला आहे. त्यांनी कोणतेही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात नाही, असं सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *