Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण; शिवानी अग्रवालला रक्त बदलण्याचा सल्ला कोणी दिला? धक्कादायक माहिती समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुन ।। पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी पुन्हा एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच रक्त बदलण्याचा सल्ला दिला होता, हे आता पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुलाऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणी ही मोठी अपडेट समोर आली आहेत.

विशाल अग्रवाल आणि मकानदारची एका कॅफेत भेट झाली होती. तुमच्यावर कारवाई होईल, असा इशारा मकानदारने विशाल अग्रवाल यांना दिला होता. या भेटीनंतर विशाल अग्रवाल हे संभाजीनगर येथे फरार झाले (Pune Porsche Accident) होते. ससून रूग्णालयामध्ये रक्ताचे नमुने बदलण्यात अश्फाक मकानदारचा हात असल्याचं समोर आलं आहे, पोलीस तपासात तसं निष्पन्न झालं आहे. ससून रूग्णालयातील डॉ. तावरे अन मकानदारचे पाच महिन्यात ७० फोन झाल्याचं समोर आलं आहेत.

अश्फाक मकानदारने पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल करण्यासाठी आरोपीच्या आईला मदत केली आहे. त्याला १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली (Blood Report Exchanege Update) होती. धक्कादायक बाब म्हणजे, रक्त बदलण्याचा सल्लाच मकानदारने शिवानी अग्रवालला दिल्याचं पोलीस तपासात समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणी रोज धक्कादायक खुलासे होत आहेत.

पुण्यामध्ये १८ मे रोजी रात्री एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगातील आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडलं होतं. त्यानंतर हा मुलगा विशाल अग्रवालचा असल्याचं समोर आलं होतं. त्याला वाचवण्यासाठी विशाल अन् शिवानी अग्रवालने (Shivani Agarwal) त्याचे ब्लड रिपोर्ट बदलले होते. परंतु याचा पर्दाफाश झाला. पण ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी मास्टर माईंड कोण याचा पोलीस शोध घेत होते, तेव्हा मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *