‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेची आज ऑनलाईन सोडत; पालकांना ऑनलाईन सहभागी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुन ।। ‘आरटीई’ २५ टक्के राखीव विद्यार्थी ऑनलाईन अर्ज MISSION प्रक्रियेची शुक्रवार (दि. ७) सकाळी ADMISSION ११ वाजता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने ऑनलाईन सोडत काढली जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी दुर्बल, वंचित घटकातील बालकांना ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवली जात आहे. प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने बदल करीत जिल्हा परिषद, महापालिका शाळांचा समावेश केला. याच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाच्या निर्णयाने आदेशाला स्थगिती देऊन नवीन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी प्रवेशाची सोडत काढण्यात येणार आहे. यात पालकांना ऑनलाईन सहभागी होता येणार आहे.

क्षमतेपेक्षा जास्त अर्ज
आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील ३२५ प्रवेशपात्र शाळा असून, ३ हजार ३२ हून प्रवेश जागा आहेत. कमी कालावधीत आरटीई प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा जास्त सुमारे ३,८९९ 447 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *